President Blog
आज हरपलं देहभान
जीव झाला खुला बावळा
पाहन्या गा तुझ्या लोचनात
भाबड्या लेकरांचा लळा
"वेस्टएंड वारी" चे आज प्रस्थान होत आहे. आणि ह्या "वेस्टएंड वारी" २०२१-२२ दिंडी चा अध्यक्ष म्हणून मी काम पाहणार आहे. आपण सर्व वेस्टएंड वारकरी ही दिंडी एकत्र घेऊन जाणार आहोत. आपण वर्षभर समाजासाठी काही उपयोगी असे सामाजिक काम करण्यासाठी ही वारी करत असतो आणि करत आहोत.
आपण ह्या समाजासाठी काम करणे, हे पांडुरंगाचीच सेवा करण्याइतपत पुण्याचं काम असेल असेच काम एकत्र येऊन करू. आणि आपण आपल्या कामातच पांडुरंग पाहू शकू असे वाटते. आणि म्हणून ही रोटरी वेस्टएंड वारी आपण काढत आहोत.
'वेस्टेएन्ड हँड फॉर कम्युनिटी' हे ब्रीद घेऊन शैक्षणिक, सामाजिक अनेक प्रकल्प निश्चितच करणार आहोतच.
प्रती वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील आपण वॉटर प्रोजेक्ट करणार आहोत, व्हेल्ले तालुक्यातील पाबे नावाच्या गावामधील अंदाजे १२०० लोकांसाठी
पाण्याची विहीर, आणि गावातील प्राण्यांना पिण्याचे पाण्याचे एक छोटे तळे करून देण्याचे नियोजन आहे. रो. राजीव दाढे ह्याचे मदतीने ९२०० युरो एका आंतराष्ट्रीय कंपनीने मंजूर देखील केले आहेत. निराधार मुलींसाठी बेसिक नर्सिंग एज्युकेशन नोकरीसह देण्याचा मानस आहे. अश्या अनेक पातळीवर आपण एकत्र येऊन काम करायचे आहे. सर्वोतपरी सक्षम संचालक मंडळ आहे. ते आपल्या सर्वंच्या पाठीशी आहेतच.
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील पब्लिक इमेज तसेच सामाजिक कामां साठी फंड रेजिग होऊ शकणारा प्रकल्प
' द ड्रिमर द डुअर - द अनटोल्ड स्टोरी ऑफ शेखर मेहता हे रोटरी आंतरराष्ट्रीय चे २०२१-२२ चे अध्यक्ष ह्यांची लाईफ जर्नी सांगणारे पुस्तक मराठी,हिंदी.इंग्रजी भाषेत प्रकाशित करत आहोत.
आपल्या सभासदांसाठी, ह्या वारी मध्ये फेर धरण्यासारखे, रंजनाचे कार्यक्रम म्हणून मनोरंजन, वैचारिक,सांगीतिक अश्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मेजवानी म्हणून मान्सून,हुरडा पार्टी, ऑगस्ट मध्ये तर 'हंसाना जरुरी है ..!' हा सप्टेंबर मध्ये कार्यक्रम आयोजित करून हिंदी भाषा दिवस साजरा करणार आहोत.ह्या वर्षीचे क्लब चे बुलेटिन - द विंड प्रती अंक १००० वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत, मित्रहो तुम्हा सर्वांना अजून काही सुचवायचे असेल तर अवश्य सुचवा.
ह्या वारीच्या दिंडीचा अध्यक्ष होण्याच्या निमित्ताने हि एक गोष्ट सांगावीशी वाटते ... ती म्हणजे
मित्रहो ...! जुलै २०१७ मध्ये माझा मित्र रो आदित्य देवधर मुळे मी वेस्टएंड क्लब जॉईन केला. आणि त्यानंतर २०१९-२० मध्ये सेक्रेटरी २०२०-२१ मध्ये क्लब ऍडमिन आणि आता २०२१-२२ प्रेसिडेंट म्हणून आपल्या समोर आहे. मी इथवर येण्यात आदित्यचे जेवढे योगदान आहे तितकंच बाकी सर्वांचे आहे, आदित्य मुळे तुम्हा सर्वांशी स्नेह, मैत्रीचे बंध तयार होत गेले. मला रोटरी मध्ये आणले ते आय पी डी जी.रो. रश्मी कुलकर्णी आणि श्यामकाका कोपर्डेकर ह्यांनी.. पूर्वी मी पार्वती क्लब चा जवळपास ८ वर्ष सभासद होतो. परंतु तो क्लब सोमवारी भरायचा .. माझी एकाच साप्ताहिक सुट्टी देखील रोटरी मध्ये जायची म्हणून बदल केला आणि त्याच दरम्यान आदित्य ची आणि माझी मैत्री झाली आणि मी वेस्टएंड क्लब जॉईन केला.
... पुस्तक क्षेत्रात संपादक, प्रकाशक आणि विक्रेता म्हणून काम करत असल्याने रोटरी च्या अनेक क्लब शी अनेक वर्ष संबंध जुळत आले आहेत.
अध्यक्ष होणे ही एक सुवर्ण संधी तर असतेच पण एक निस्सीम आनंद असतो.. एका सुरेख चविष्ट पदार्थ खावा आणि त्याची सुरेख चविष्ट आठवण राहावी अशी मनोधारणा आज माझी आहे.
तुम्हा सर्वांच्या साक्षीने आज रोटरी पुणे वेस्टएंड चा अध्यक्ष होत आहे ह्याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या विश्वासला नक्की पात्र ठरु शकेन असा विश्वास वाटतो. आणि ह्या वेस्टएंड वारी साठी तुम्ही सर्व माझ्या बरोबर हवे आहात ... आणि ते नक्कीच राहाल असा विश्वास आहे.
स्नेह, प्रेम आहेच ते अधिकाधिक वृद्धिगंत होवोत हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना !
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज कि जय !